सकारात्मक! 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 26 दिवसांत मृत्यूदंड

rajasthan
rajasthan

जयपूर- POCSO विशेष कोर्टाने राजस्थानमधील एका बलात्कार प्रकरणात आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. राजस्थानच्या झुनझहुनू Jhunjhunu जिल्ह्यातील एका व्यक्तीने 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे गुन्हाच्या 26 दिवसांनतर आरोपीला शिक्षा झाली आहे. तसेच कोर्टाने पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या तत्परतेबद्दल कौतुक केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 21 वर्षीय तरुणाने 5 वर्षाच्या मुलीचे अपहरण केले होते. मुलगी तिच्या घराजवळच्या शेतामध्ये खेळत होती. 19 फेब्रवारीची ही घटना आहे. इतर मुलांनी मुलीच्या अपहरणाची माहिती कुटुंबीयांना  दिली होती. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी पाच तासानंतर आरोपीला अटक केली होती. 

चिमुकली जखमी अवस्थेमध्ये एका निर्जण स्थळी आढळून आली. आरोपीची ओळख पटल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणाचे तपास अधिकारी सुरेश शर्मा यांनी सांगितलं की, आरोपीला कोर्टाने दोषी ठरवलं असून पोक्सोअंतर्गत त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात तत्काळ कारवाई करण्यात आणि आवश्यक ते पुरावे गोळा करण्यात आले.  चार्जिशिट दाखल करण्यात आली आणि 26 दिवसांमध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दाखवलेल्या तत्परनेबद्दल कोर्टाने कौतुक केले. हे एक आदर्श उदाहरण असून या तपासात थेट, वैज्ञानिक, इलेक्टॉनिक पुराव्याचा योग्य वापर करण्यात आला.  कोर्टाने असंही म्हटलं की, पोलिसांनी गोळा केलेले पुरावे आरोपीला शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याप्रकरणी भाष्य करताना म्हटलंय की, पोलिसांनी चार्जशिट 9 दिवसांमध्ये दाखल केली होती. त्यानंतर 26 दिवसात आरोपीला शिक्षा झाली. या प्रकरणाने पोलिसांची, कोर्टाची आणि सरकारची कार्यक्षमता दाखवून दिले आहे. शिवाय सरकारची गुन्हेगारांना शिक्षा देण्याबाबत असणारी बांधिलकी दिसून येते. गेहलोत यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. राजस्थान पोलिस प्रमुख एम एल लाथर यांनीही Jhunjhunu पोलिसांना शुभेच्छा दिल्या आहेत. जयपूर पोलिस अधिकारी हावा सिंग गुमारीया यांनी सांगितलं की, सुनावणीवेळी ४० प्रत्यक्षदर्शी आणि २५० डॉक्युमेंट्स कोर्टामध्ये सादर करण्यात आले होते. पोलिसांनी चार्जशिट दाखल करण्यासाठी १२ ते १३ तास काम केलं, असं गेहलोत म्हणाले.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com