#MoneyRain | ...आणि त्याने थेट बादलीने नोटा ओतल्या, पाहून डोळे फिरतील! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...आणि त्याने थेट बादलीने नोटा ओतल्या, पाहून डोळे फिरतील!

...आणि त्याने थेट बादलीने नोटा ओतल्या, पाहून डोळे फिरतील!

sakal_logo
By
ओमकार वाबळे

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोक गुजराती गायिकेवर पैशांचा पाऊस पाडत आहेत. वास्तविक हा व्हिडिओ गुजराती लोक गायिका उर्वशी रादियाचा आहे. उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय.

उर्वशी एका कार्यक्रमात स्टेजवर गाणं गात असतानाच मागून एक चाहता तिच्यावर बादलीने पैसे ओतताना दिसतो. या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळतायेत.

१५ नोव्हेंबरला पार पडलेल्या तुळशीच्या लग्नातील हा व्हिडीओ आहे. उर्वशी तुळशीच्या लग्न कार्यक्रमात गाणं गाण्यासाठी पोहोचली होती. या व्हिडीओमध्ये फक्त एकदाच नाही, तर अनेक वेळा लोक उर्वशीवर बादल्या घेऊन पैसे ओतताना दिसत आहेत. एका क्षणी उर्वशीचं हार्मोनियम नोटांनी भरलेलं दिसतंय. शेवटी या नोटा बाजूला सरकवून उर्वशी गाणं गाऊ लागते.

उर्वशीने स्वत: व्हिडीओ शेअर केला

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत उर्वशीने लोकांच्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. व्हिडिओसोबत त्याने 'मनी रेन'चा हॅशटॅगही लावला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक केलं आहे. चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊसही या व्हिडीओ पोस्टवर पडला आहे.

loading image
go to top