esakal | सुधरणार नाहीत! चक्क ATM मधून सॅनिटायझरच चोरलं, Viral Video
sakal

बोलून बातमी शोधा

सुधरणार नाहीत! चक्क ATM मधून सॅनिटायझरच चोरलं, Viral Video

सुधरणार नाहीत! चक्क ATM मधून सॅनिटायझरच चोरलं, Viral Video

sakal_logo
By
नामदेव कुंभार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्यावर आधीच रुग्णांचे बारा वाजले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी मास्क, हात साफ करणे आणि सोशल डिस्टन्सिंग असा त्रिसुत्री कार्यक्रम आहे. त्याधर्तीवर अनेक सार्वजनिक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत. जेणाकरुन लोकांना कोरोना काळात आपली काळजी घेण्यासाठी फायदा होईल. पण त्या हॅण्ड शॅनिटायझरवर चोरट्यांनी हात साफ केला तर... होय... तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका एटीएममध्ये असलेल्या हॅण्ड सॅनिटायझरवरच चोरानं हात साफ केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएस आधिकारी दिपांशू काबरा यांनी या चोराचा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी व्हिडिओ पोस्ट करताना सुधरणार नाहीत असं कॅप्शन लिहिलं आहे. काबरा यांनी व्हिडिओसोबत पोस्टमध्ये लिहिलेय की, ''अशा मूर्खांपासून सॅनिटायझर वाचवण्यासाठी प्रत्येक एटीएममध्ये 200-300 रुपयांचा पिंजरा लावाला लागला तर शेकडो कोटी रुपये यालाच लागतील. तुम्ही जर मर्यादेत राहिला असता तर हे पैसे वाचले असते. तुमच्याच भल्यासाठी वापरता आले असते. '' काबरा यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. पाहा व्हिडिओ......

व्हायरल व्हिडिओत जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर ही व्यक्ती एटीएममध्ये सॅनिटाझर चोरण्यासाठी आल्याचं दिसेल. ती व्यक्ती आपल्या एटीएम कार्डचा वापर करते पण पैसे वगैरे काढत नाही. यावेळी सर्व लक्ष जवळील सॅनिटायझर बाटलीकडे आहे.

loading image