

Mandla Eklavya Model Residential School Earns Top National Recognition With Prestigious Award From the President
esakal
आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि शैक्षणिक संस्थांचा विकास करण्यासाठी केलेल्या कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत मध्य प्रदेशला दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष समारंभात मध्य प्रदेश जनजातीय कार्य विभागाशी संबंधित ‘एमपी सरस’ आणि मंडला येथील एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयाला सन्मानित करण्यात आले.