
लखनौ : उत्तर प्रदेशातील ‘मँगो मॅन’ अशी ओळख असणाऱ्या कलिमुल्ला खान यांनी नव्याने विकसित केलेल्या आंब्याच्या नव्या प्रजातीला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचे नाव दिले आहे. मलिहाबाद येथील त्यांच्या बागेत कलम तंत्राचा वापर करून कलिमुल्ला यांनी ही नवी प्रजाती विकसित केली आहे, या आंब्याच्या प्रजातीला त्यांनी राजनाथ आंबा असे नाव दिले आहे.