Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा; 44 आमदार अन् राज्यपालांची भेट

BJP claims support of 44 MLAs in Manipur, meets Governor to form new government: मणिपूर विधासभा ६० सदस्यीय आहे. एका आमदाराचा मृत्यू झाल्याने सद्य स्थितीत ५९ विधानसभा सदस्य आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे ३२ मैतेई आमदार आहेत, तीन मणिपुरी मुस्लिम आमदार आणि ९ नागा आमदार आहेत. सगळे मिळून भाजप आघाडीकडे ४४ आमदार आहेत.
Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा; 44 आमदार अन् राज्यपालांची भेट
Updated on

नवी दिल्लीः मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल अजय कुमार भल्लांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली. भाजपसोबत येण्यासाठी ४४ आमदार तयार आहेत, इतर ९ जणांना सोबत घेऊन राज्यापालांना सत्ता स्थापनेचा दावा सांगितला, असं सिंह म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com