
मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यातील न्यू समतल गावाजवळ भारत-म्यानमार सीमेवर बुधवारी (१४ मे) रात्री झालेल्या तीव्र चकमकीत आसाम रायफल्सने १० अतिरेक्यांना ठार केले. भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने दिलेल्या माहितीनुसार, खेंगजॉय तहसीलमधील या भागात सशस्त्र अतिरेक्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ऑपरेशन अद्याप सुरू असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.