PM Modi No Confidence Motion : मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यास लोकसभा अध्यक्षांची परवानगी, आता...

Om Birla
Om Birlasakal
Updated on

नवी दिल्ली - मागील काही दिवसांपासून देशभरात मणिपूर हिंसेचा आणि महिला अत्याचाराचा मुद्दा गाजत आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहे. विरोधक कधी नव्हे ते या मुद्दावरून एकत्र येऊन आक्रमक झाले आहे. मात्र सत्ताधारी मोदी सरकारकडून मणिपूर मुद्दावर चर्चा करण्यास तयारी दाखवण्यात आली नव्हती. आज अखेर विरोधकांनी अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परवानगी दिली आहे.

मणिपूर हिंसेने संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघाले आहे. अविश्वास ठरवाच्या निमित्ताने तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवर निवदेन देतील, अशी आशा विरोधकांना आहे. काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र देण्यात आलं होतं.

Om Birla
Raj Thackeray on Toll Plaza: म्हैसकर कुणाच्या जवळचे? अमित ठाकरेंवरील भाजपच्या टीकेनंतर राज ठाकरेंचा संतप्त सवाल

कोणताही सदस्य अविश्वास ठराव आणू शकतो. मात्र ५० खासदारांच्या सह्याचे अनुमोदन त्यासाठी आवश्यक असते. त्यानुसार काँग्रेसने याची तयारी केली. २०१४ पासून हा दुसरा अविश्वास ठरवा आहे. अध्यक्ष परवानगी देणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र त्याला परवानगी मिळाली आहे. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला अविश्वास प्रस्तावासाठी तारिख आणि वेळ ठरवतील. त्यानुसार अविश्वास ठराव मांडण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.