Manipur Crisis : घर दुरावले, रोजीरोटीही हिरावली; मणिपूरवासिय दोन वर्षांनंतरही निर्वासित
Manipur News : मणिपूरमधील वांशिक दंगलीनंतर दोन वर्षांनंतरही हजारो कुटुंबं निर्वासित अवस्थेत आहेत. रोजगार, घर आणि शिक्षणाचा आधार हरवलेली ही माणसं आजही अनिश्चित भविष्याच्या छायेत जीवन जगत आहेत.
इम्फाळ : ‘‘कधी काळी हाताला काम मिळत होतं, उद्योगधंदाही बऱ्यापैकी चालायचा. तीन मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाची गुजराण त्या व्यवसायावरच होत होती. दंगल झाली अन् हे विस्थापितांचे जिणं नशिबी आलं.