घर तपासलं आता बँक लॉकर तपासणार; सिसोदिया म्हणाले, CBIचं स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manish sisodia tweets claimed that cbi is going to check his bank locker on tuesday Delhi Excise Case

घर तपासलं आता बँक लॉकर तपासणार; सिसोदिया म्हणाले, CBIचं स्वागत

Delhi Excise Case : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी दावा केला की सीबीआय (CBI) उद्या त्यांचे बँक लॉकर पाहण्यासाठी येणार आहे. त्यांनी ट्विट माहिती दिली आहे की, उद्या सीबीआय आमचे बँक लॉकर पाहण्यासाठी येत आहे. 19 ऑगस्ट रोजी माझ्या घरी 14 तासांच्या छाप्यात काहीही सापडले नाही. लॉकरमध्येही काहीही सापडणार नाही. सीबीआयचे स्वागत आहे. माझं आणि माझ्या तपासासाठी कुटुंबाचे पूर्ण सहकार्य असेल.

दिल्लीच्या मद्य धोरणातील कथित घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने 19 ऑगस्ट रोजी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता, मनीष सिसोदिया हे सोबतच आबकारी विभागाचे काम देखील पाहातात. सुमारे 14 तास चाललेल्या या छाप्यात सीबीआयने मनीष सिसोदिया यांचा फोन आणि संगणक देखील जप्त केला होता. याप्रकरणी सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्यासह 15 जणांविरुद्ध एफआयआरही नोंदवला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दिल्लीच्या नवीन मद्य धोरणात अनियमितता असल्याचा आरोप करणाऱ्या दिल्लीच्या मुख्य सचिवांच्या अहवालानंतर नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी गेल्या महिन्यात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. नोव्हेंबरमध्ये आणलेल्या धोरणांतर्गत दारू दुकानाचे परवाने खासगी व्यापाऱ्यांना देण्यात आले. या दारू धोरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.

हेही वाचा: Jio AIRFIBER : काय आहे हे अनोखे डिव्हाइस, कसे काम करेल? जाणून घ्या सर्व काही

दरम्यान या प्रकरणी आपकडून भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे मनीष सिसोदिया यांनी सरकारी दारूच्या दुकानातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हे धोरण बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, दिल्ली सरकार करत असलेल्या कामावर केंद्र नाराज आहे, त्यामुळेच आप सरकारच्या मंत्र्यांना लक्ष्य केले जात असल्याचे देखील म्हटले आहे.

मनीष सिसोदिया यांनीही नुकताच असा दावा केला होता की, भाजपने त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेण्याची ऑफर दिली होती. भाजपने सांगितले की, जर त्यांनी आप तोडून भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना मुख्यमंत्री केले जाईल आणि त्यांच्यावरील सर्व खटलेही बंद केले जातील. मात्र, भाजपने मनीष सिसोदिया यांचा हा दावा फेटाळून लावला असून त्यांना पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा: अमित शहांबद्दलचं वक्तव्य भोवलं! विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Web Title: Manish Sisodia Tweets Claimed That Cbi Is Going To Check His Bank Locker On Tuesday Delhi Excise Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :delhiaap