esakal | डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर; रुग्णालयातून सुटी
sakal

बोलून बातमी शोधा

Manmohan Singh out of AIIMS hospital in Delhi

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आज (ता. १२) रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर; रुग्णालयातून सुटी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आज (ता. १२) रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रविवारी रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. नितीश नायक यांच्या देखरेखीखाली डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर उपचार सुरू होते. नव्या औषधांची रिअॅक्शन झाल्याने मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली असल्याचं सांगण्यात आलं होतं. पंरतु, आज डॉक्टरांच्या परवानगीनंतर त्यांना आज घरी सोडण्यात आलं. तसंच या ठिकाणी त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही सांगण्यात आले आहे.

रेशनकार्डाच्या नियमात केंद्राकडून बदल; तब्बल एवढ्या लोकांना होणार फायदा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे हार्ट पेशंट आहेत. यापूर्वी दोन वेळा त्यांची बायपास सर्जरी झाली आहे. १९९० मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये त्यांची पहिली बायपास सर्जरी झाली होती. त्यानंतर २००४ मध्ये त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. २००९ मध्ये पुन्हा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी ब्लॉक्ड आर्टरिज ओपन करण्यासाठी त्यांची आणखी एक बायपास सर्जरी करण्यात आली होती. याव्यतिरिक्त त्यांना मधुमेहाचा त्रासदेखील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.