

Manmohan Singh
esakal
SY Quraishi New Book: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांनी एक धक्काकदायक खुलासा केला आहे. २०१२ साली झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काळात एका वादावरून व्यथित झालेल्या मनमोहन सिंग यांनी, "मी आत्महत्या करेन," असे शब्द कुरैशी यांच्याशी बोलताना काढले होते.
एवढंच नाही तर निवडणूक आयोग हा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे आणि त्याच्या स्वायत्ततेवर डाग लागणे आपल्याला सहन होणार नाही, अशी भावना तत्कालीन पंतप्रधानांची होती.