manmohan singh
manmohan singh

डॉ. मनमोहनसिंगांची होती पाकिस्तानवर हल्ल्याची तयारी; कोणी केला गौप्यस्फोट

लंडन : मुंबईवर २६/११च्या हल्ल्यानंतर देशात दहशतवादी हल्ले कमी झाले होते. पण, जुलै २०११मध्ये मुंबईत पुन्हा तीन ठिकाणी बॉम्ब स्फोट झाले होते. त्यावेळी तात्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानवर हल्ल्याची तयारी दर्शवली होती, असा धक्कादायक खुलासा एका पुस्तकातून झाला आहे. हे पुस्तक कोण्या सामान्य माणसाचे नाही तर, ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी लिहिले आहे.

‘मनमोहनसिंग संत माणूस’
"डॉ. मनमोहनसिंग हे संतमाणूस आहेत. मात्र, भारताला असलेल्या धोक्‍यांमुळे ते संतप्त होत. मुंबईवर जुलै 2011 मध्ये झाला तसा आणखी एक जरी दहशतवादी हल्ला झाला, तर पाकिस्तावर लष्करी कारवाई करावी लागेल, असे त्यांनी मला सांगितले होते,' अशी आठवण ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितली आहे.
डेव्हिड कॅमेरॉन हे 2010 ते 2016 या दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान होते. याकाळात त्यांनी तीन वेळेस भारताला भेट दिली होती. त्यांनी "फॉर द रेकॉर्ड' हे पुस्तक लिहिले असून, त्यात त्यांनी भारताविषयीची त्यांची मते व्यक्त केली आहेत.

‘भारताशी ब्रिटनची विशेष मैत्री असावी’
"पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबरोबरचे माझे संबंध चांगले होते. ते संतमाणूस आहेत. मात्र, भारताला दहशतवाद्यांचा धोका असल्याने ते संताप व्यक्त करत. मुंबई हल्ल्यासारखा आणखी एक दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानवर कारवाई करू, असे त्यांनी मला त्यांच्या ब्रिटनदौऱ्यात सांगितले होते. सत्तास्पर्धेत कॅमेरॉन यांना ब्रिटनमधील भारतीयांच्या मोठ्या पाठिंब्याचा फायदा झाला होता. त्यामुळेच त्यांच्या काळात त्यांनी भारताशी संबंध वाढविण्यावर विशेष भर दिला होता. गोध्रा दंगलीनंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर घातलेला राजकीय बहिष्कार त्यांनीच 2013 मध्ये उठविला होता. भारताशी संबंध हे वसाहतीच्या काळात होते तसे नाही, तर बदलत्या काळानुसार सर्वांत जुनी लोकशाही आणि सर्वांत मोठी लोकशाही यांच्यात असावेत, तसे असायला हवेत, असे कॅमेरॉन यांचे मत होते. भारताशी ब्रिटनची विशेष मैत्री असावी, असे आपले मत आहे, असे कॅमेरॉन यांनी पुस्तकात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com