'अबतक' 68 भाग... 'मन की बात' कार्यक्रमातील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 30 August 2020

या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधण्याची मोदींची ही 68 वी वेळ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओवरील लोकप्रिय 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधण्याची मोदींची ही 68 वी वेळ ठरली. देशातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कल्पकतेचा नवा अविष्कार करुन मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. पोशख आहार आणि आरोग्य यासंदर्भातील मोदींनी भाष्य केले. आत्मनिर्भर भारतासाठी आपल्याला आत्मविश्वासाने पुढे जायचे आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले. मोदींनी आपल्या भाषणात खेळणी तयार करणाऱ्या उद्योगांचाही उल्लेख केला. खेळणी उत्पादनामध्ये देशात नवा केंद्रबिंदू तयार होत आहे. याची व्यापकता विकासात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.  

-नव्या शिक्षण धोरणात खेळाला अधिक महत्व

- स्वदेशी खेळणी खरेदी करण्यावर भर दिला पाहिजे. खेळण्याच्या 7 लाख कोटींची बाजारपेठ असून तिथं भारताचा वाटा वाढणार

- आपल्या देशात नव्या कल्पकतेची कमी नाही.

- ग्रामीण भारतातील अनेक तरुण नवनवीन ऍप बनवत आहेत, ऍप इनोव्हेशन चॅलेंजला उत्कृष्ट प्रतिसाद, चिंगारी ऍपचा उल्लेखही केला.

- आजच्या अनेक कंपन्या पूर्वी स्टार्टअप होत्या. स्टार्टअपचा फायदा होतोय

- शरीराला जेवढी गरज तेवढाच आहार घेतला पाहिजे.

-लष्करातील 2 श्वानांचं (लिसा आणि विदा) कौतुक

-लहानग्यांच्या संवादातुन खूप शिकायला भेटतं

-पर्यावरणपूरक खेळणी बनवणार

-बीड पोलिसातील श्वान ' रॉकी'चा उल्लेख

-श्वानांच्या भारतीय प्रजातील प्रोत्साहन दिले पाहिजे

-आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांचं दायित्व

-देशातील जनतेच्या संयमाचीही स्तुती
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mann ki baat prime minister narendra modi address the nation for the 68th time today through the program