मनोज वाजपेयीच्या 'मैं हीरो हूं या आप'? प्रश्नावर लालूंचं भन्नाट उत्तर; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manoj bajpayee  lalu yadav

मनोज वाजपेयीच्या 'मैं हीरो हूं या आप'? प्रश्नावर लालूंचं भन्नाट उत्तर; म्हणाले...

पाटणा : अभिनेते मनोज वाजपेयी यांनी आज राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी भेट घेतली. मनोज वाजपेयी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (Lalu Prasad Yadav News in Marathi)

हेही वाचा: काँग्रेस नेत्याचे कर्मचारी महिलेशी गैरवर्तन; महिलेच्या प्रियकराने धु..धु..धुतले

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी या भेटीची छायाचित्रे ट्विट करून मनोज वाजपेयींचा 'बिहारचे सुपूत्र' म्हणून उल्लेख केला.

लालू प्रसाद यादव यांच्या घरी पोहोचल्यानंतर मनोज बाजपेयी यांनी सर्वप्रथम तेजस्वी यादव यांची भेट घेतली आणि त्यानंतर लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. त्यांनी लालू यादव यांना पुष्पगुच्छ देऊन नमस्कार केला. यानंतर तेजस्वी यादव यांच्याशी चर्चा करताना त्यांनी लालू यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी लालू यादव यांना विचारले की, तुमची तब्येत आता चांगली आहे का? मनोज वाजपेयी म्हणाले की, ते केवळ लालू यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेण्यासाठी आले आहेत.

हेही वाचा: Anurag Thakur : मुंबईत अजूनही शौचालय नाहीत ही दुर्दैवी गोष्ट आहे

या भेटीवेळी मनोज वाजपेयी यांनी लालू यादव यांना विचारले की, मैं हिरो हूं या आप ? यावर लालू यादव म्हणाले की मी. त्यानंतर तेजस्वी आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकला.

Web Title: Manoj Bajpayee Asked Am I A Hero Or You Laughter At Lalu Yadavs Reply

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..