Delhi Election : तिवारी म्हणाले होते 'ट्विट जपून ठेवा'; निकालनंतर होतायेत ट्रोल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

एकीकडे अरविंद केजरीवाल यांनी विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. आम आदमी पक्षाने जवळपास ६३ जागा मिळवत दिल्लीत पुन्हा एकदा विजयी पताका फडकवली आहे. एकीकडे अरविंद केजरीवाल यांनी विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 

मनोज तिवारी यांनी 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर ट्वीट करत म्हंटले होते की, सर्व सर्वे खोटे ठरणार असून, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 48 जागा मिळतील आणि आम्ही सरकार सुद्धा बनवू. त्यांनतर एव्हीमला दोष देऊ नका. तर मी केलेला हा ट्वीट सांभाळून ठेवा,असेही तिवारी म्हणाले होते.

आता निकाल स्पष्ट झाला असताना आप ६३ तर भाजप ०७ जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. दिल्लीत पुन्हा केजरीवाल सरकार सत्तेत येणार हे जवळपास निश्चित आहे. म्हणून सध्या सोशल मीडियावर मनोज तिवारी यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manoj Tiwari trolled fiercely for old tweet