पंतप्रधानांकडून ‘मनरेगा’ची चेष्टा : राहुल

वायनाड: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थिंनी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
वायनाड: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थिंनी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

वायनाड (केरळ) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मनरेगाची टवाळी केली होती पण यूपीए सरकारने आणलेल्या या योजनेमुळेच कोरोना काळामध्ये लोकांना रोजगार मिळाला, ही योजनाच त्यांच्यासाठी मोठा आधार ठरली ही बाब मान्य करावी लागेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज केले. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राहुल म्हणाले, ‘‘काँग्रेसने नेहमीच गरिबांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले पण विद्यमान सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न हे अधिक सशक्त असणाऱ्यांना आणखी ताकद देण्याचे आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी भर संसदेमध्ये मनरेगाची चेष्टा केली होती. कोरोना काळामध्ये मनरेगानेच लोकांना तारले. बचत गट आणि मनरेगासारख्या योजना यूपीएने आणल्या. लोकांना सशक्त करण्याचे हे सर्वांत मोठे माध्यम होते. यूपीएच्या काळामध्ये आर्थिक विकासाचा वेग वाढला होता त्यालाही मनरेगासारख्याच योजना कारणीभूत होत्या.’’

मोटारीतून उतरून मोदींनी लोकांचे हाल पाहावे - वद्रा
नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई, उद्योगपती रॉबर्ट वद्रा सोमवारी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ घरापासून सायकल चालवीत कार्यालयात गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वातानुकूलित मोटारीतून बाहेर येऊन लोकांचे कसे हाल होत आहेत, हे पाहावे अशी टीका त्यांनी केली.

वद्रा सूट, बूट आणि हेल्मेट घालून खान मार्केट परिसरातील घरापासून कार्यालयात गेले. त्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे त्यांनी ट्वीट केली आहेत. त्यांच्या बरोबर दोन सहकारीही सायकल चालवीत आहे. वद्रा यांनी प्रसार माध्यमांशीही संवाद साधला. ते म्हणाले की, तुम्ही वातानुकूलित मोटारीतून बाहेर आलात तर कदाचित इंधनाचे दर कमी कराल. आधीच्या सरकारांना दोष देणे आणि दुसऱ्या विषयाकडे लक्ष वेधतात. 

बोलतो ते करतो
वद्रा यांनी म्हटले आहे की, मी जे बोलतो ते करतो. सोमवारी सकाळी भरपूर वाहतूक असताना सायकलवर कार्यालयात गेलो. मला जनतेविषयी काळजी वाटते. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असल्यामुळे त्यांच्यावर काय अवस्था ओढवली असेल हे मी समजू शकतो. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com