

Mantravati Shakya success story Uttar Pradesh
sakal
इटावा जिल्ह्यातील भतोरा नावाच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या मंत्रवती शाक्य यांची यशोगाथा आज संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी अभिमानाचा विषय ठरली आहे. अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातील असलेल्या मंत्रवती यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर शेताच्या बांधापासून ते दिल्लीच्या 'कर्तव्य पथा'पर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आधुनिक शेती आणि सरकारी योजनांच्या मदतीने ग्रामीण अर्थव्यवस्थेत किती मोठा बदल घडू शकतो, याचे त्या एक जिवंत उदाहरण बनल्या आहेत.