Modi Government
esakal
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कामगार धोरण २०२५ च्या (Labour Policy) मसुद्यात मनुस्मृतीचा उल्लेख केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या मसुद्यात प्राचीन ग्रंथांचा संदर्भ देताना मनुस्मृतीमध्ये कामगारांचे हित, वेतनव्यवस्था आणि न्याय याबाबत दिलेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला असून, काँग्रेसने म्हटले आहे की “आरएसएसला (RSS) मनुस्मृती सर्वात जास्त प्रिय आहे.”