Fri, Feb 3, 2023

Building Collapse : मोहालीत निर्माणाधीन इमारतीचे छत कोसळले, अनेक मजूर अडकल्याची भीती
Published on : 31 December 2022, 2:12 pm
Under Constriction Building Collapsed In Mohali : पंजाबमधील मोहाली जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळून मोठा अपघात घडल्याचे वृत्त समोर आले आहे.
हे ही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?
मोहाली जिल्ह्यातील खरारमधील सेक्टर-126 मध्ये हा अपघात झाल्याचे सांगितले जात असून, ढिगाऱ्याखाली अनेकजण गाढले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. खरारमधील या परिसरात एका शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम सुरू होते. त्यावेळी अचानक छत कोसळून हा अपघात घडला आहे. ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक अडकले आहेत याची ठोस माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.