HP Election: जेपी नड्डा यांची ही कर्मभूमी; या मुद्द्यांमुळे हिमाचल प्रदेशमध्ये भाजप...

Himachal Pradesh Election 2022
Himachal Pradesh Election 2022esakal

J.P. Nadda News: हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या राज्यात सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा सत्तेवर येत नाही, असा इतिहास आहे. परंतु ज्या झपाट्याने भाजप आपल्या कक्षा रुंदावत आहे; त्यानुसार हिमाचल प्रदेशमध्येही भाजप ताकदीने उतरल्याचं दिसतंय. उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमध्ये भाजपने दुसऱ्यांदा सत्ता काबिज केली.

Himachal Pradesh Elections

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची हिमाचल प्रदेश ही कर्मभूमी आहे. त्यांनी हिमाचलमध्ये विद्यार्थी चळवळीला चालना दिले. तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची जवळीक निर्माण झाली. सध्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. चालू विधानसभेत भाजपचे ४४ सदस्य आहेत तर काँग्रेसचे २१ सदस्य आहेत. अपक्ष ३ सदस्य आहे.

Himachal Pradesh and Gujarat Assembly Elections 2022

काँग्रेसमधील अस्थिरतेचा परिणाम...

देशपातळीवर काँग्रसेची जी पडझड झालीय त्याची झळ हिमाचल प्रदेशमध्येही पहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नाही. म्हणूनच मागील काही दिवसांमध्ये काँग्रेसचे काही नेते भाजपच्या गळाला लागले आहेत.

राजकीय तज्ज्ञांच्या मते हिमाचल प्रदेशमध्ये तिबेटियन मतदरांची संख्या लक्षणीय आहे. हे मतदार केंद्रातील सत्तेच्या अनुषंगाने राज्यात कल देतात. म्हणजे ज्या पक्षाची सत्ता केंद्रात आहे त्याच पक्षाला झुकतं माप दिलं जातं. चीनसोबतच्या संबंधावर या लोकांची मतं अबलंबून आहेत.

या प्रदेशात पहाडी लोकांच्या मतांचा कलही महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा मतपेटीवर परिणाम पाडू शकतो, असं सांगितलं जातंय.

Vande Bharat Train

हिमाचल प्रदेशमध्ये आता वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरु झालीय. गुरुवारी, दि. १३ ऑक्टोबर रोजी हिमालच प्रदेश येथील ऊना रेल्वे स्थानकातून चौथ्या वंदे भारत ट्रेनची सुरुवात झाली. ही एक्स्प्रेस ट्रेन हिमाचलमधल्या अंब अंदौरा ते दिल्ली अशी धावेल. पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी या ट्रेनचा शुभारंभ झाला, त्यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची उपस्थिती होती.

Himachal Pradesh Election 2022
Himachal Pradesh Election: येथील लोक एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता देत नाहीत, यावेळी मात्र...

या सगळ्या राजकीय परिस्थितीमुळे आणि तयारीमुळे सध्या तरी भाजपचं पारडं जड दिसत आहे. वीरभद्र सिंह यांच्या मृत्यूमुळे काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झालेली आहे. शिवाय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. सक्षम नेतृत्वाच्या आभावाचा फटका काँग्रेसला बसेल, राजकीय विश्लेषक सांगतात. याचा सरळसरळ भाजपला फायदा होईल, असं नाही.

आम आदमी पक्षाने घातलं लक्ष...

आम आदमी पक्षाने मागील दोन वर्षांपासून हिमाचल प्रदेशमध्ये लक्ष घातलेलं दिसून येतंय. दिल्ली, पंजाबनंतर हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केलाय. संघटनात्मक बांधणीवरही 'आप'ने भर दिलेला आहे. परंतु केजरीवालांकडेही सक्षम नेतृत्वाचा आभाव आहे. या पक्षाचे शीर्षस्थ नेते गुजरामध्ये गुंतल्याचं चित्र आहे.

'हिमाचल'चे विद्यमान मुख्यमंत्री जय राम ठाकूर आणि काँग्रेसचे दिवंगत नेते वीरभद्र सिंग हे आलटून-पालटून मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आता सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवणं भाजपला शक्य होईल का, हे येणारा काळच सांगेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com