
काश्मीर – जे आज एक मुस्लिम बहुल प्रांत मानला जातो, त्याची कहाणी काहीशा वेगळ्या आणि थक्क करणाऱ्या वळणांनी भरलेली आहे. परंतु या कहाणीत एक अध्याय असाही आहे, ज्यात १५ हजार मराठा सैनिकांनी काश्मीरवर कूच केली होती. पेशवे नानासाहेबांच्या हुकुमाने रघुनाथराव आणि सामाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही ऐतिहासिक मोहीम राबवली गेली होती.