TamilNadu RajBhavan: "एक भारत श्रेष्ठ भारत" अभियानाअंतर्गत तमिळनाडू राजभवनात मराठी संस्कृतीचे महोत्सव
Ek Bharat Shreshtha Bharat : तमिळनाडू राजभवनात 'एक भारत श्रेष्ठ भारत' मोहिमेंतर्गत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मराठी सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. राज्यपाल आर. एन. रवी यांच्या उपस्थितीत पारंपरिक नृत्य, संगीत आणि कलाप्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.
चेन्नई : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियानाअंतर्गत तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांच्यावतीने तमिळनाडू राजभवनाच्या परिसरातील भारतियार मंडपम येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.