स्वर्गाची दारं पर्यटकांसाठी पुन्हा खुली; पर्यटकांसाठी काश्मीर खुलं 

स्वर्गाची दारं पर्यटकांसाठी पुन्हा खुली; पर्यटकांसाठी काश्मीर खुलं 

तब्बल २ महिन्यांपासून ठप्प झालेला भारताचा स्वर्ग म्हणजेच काश्मीर हे आता पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. गृह विभागाने २ ऑगस्ट २०१९ रोजी पर्यटकांना केलेली मनाई ही आता मागे घेण्यात आली आहे. गृह विभागाने  पर्यटकांसाठी काढलेला हा मनाईचा आदेश आता मागे घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 8 ऑगस्टला काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला त्यानंतर पर्यटकांसाठीच्या बंदीचा आदेश मागे घेतला जावा अश्या सूचना गृहविभागाला केली असल्याचं समजतंय.

पर्यटकांसाठी जम्मू काश्मीर पुन्हा एकदा खुलं करण्यात आलंय आणि पर्यटकांना आवश्यक ते सर्व सहकार्य आणि मदत राज्य सरकारकडून मिळेल असं ताज्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

कलम 370 हटवल्यानंतर अनेक नेत्यांना देखील नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. यातील राफियाबादचे माजी आमदार मीर, उत्तर काश्मीर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे लोन तर नॅशनल कॉन्फरन्सचे पदाधिकारी नूर मोहम्मद यांची सुटका करण्यात आली आहे 

5 ऑगस्ट रोजी कलम 370 हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर  प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन बंदी करण्यात आली होती. या पर्यटनबंदीनंतर काश्मीरमधील टुरिझम व्यवसायाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता उठवण्यात आलेल्या पर्यटनबंदीमुळे काश्मिरात पुन्हा एकदा पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळेल.    

WebTitle : marathi news kashmir is now open for tourist and tourism 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com