मेघालयमध्ये काँग्रेसला एनपीपीची कडवी लढत

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

मेघालय या ईशान्य राज्यांमध्ये आज (शनिवार) विधानसभेच्या जागांसाठी मतमोजणी झाली. 60 जागा असलेल्या या राज्यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक 21 जागांवर आघाडी घेत बाजी मारली आहे. मात्र, सत्ता स्थापनेपासून ते दूर आहेत.

शिलॉंग : देशात मोजक्या राज्यांत सत्ता राहिलेल्या काँग्रेसला मेघालयमध्ये आपली सत्ता कायम ठेवण्यात अडचण निर्माण झाली आहे. काँग्रेसला नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) कडवी लढत दिली असून, अद्याप सत्ता स्थापनेचा चित्र स्पष्ट झालेले नाही.

मेघालय या ईशान्य राज्यांमध्ये आज (शनिवार) विधानसभेच्या जागांसाठी मतमोजणी झाली. 60 जागा असलेल्या या राज्यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक 21 जागांवर आघाडी घेत बाजी मारली आहे. मात्र, सत्ता स्थापनेपासून ते दूर आहेत. तर, दुसरीकडे एनपीपीनेही 17 जागा जिंकत काँग्रेसला लढत दिली आहे. भाजपला याठिकाणी म्हणावे तसे यश मिळाले नाही. भाजप फक्त 6 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे अन्य पक्षांच्या 15 सदस्यांच्या निर्णायवरच याठिकाणचे सत्ता स्थापनेचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

मेघालयमध्ये 18 फेब्रुवारीला पूर्व गारो हिल्स जिल्ह्यातील स्फोटात राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार जोनाथोन एन. संगमा यांचा मृत्यू झाल्यामुळे विलयन नगरमधील निवडणूक रद्द करण्यात आली होती. काँग्रेससाठी मेघालयातील निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. कारण, पक्ष या राज्यात गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत आहे. मात्र, यावेळी कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी भाजपने हरतऱ्हेचे प्रयत्न चालविले आहेत. मेघालयमध्ये लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचा मुलगा कॉनराड संगमा यांची नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. मात्र, नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक आघाडीमध्ये एनपीपी भाजपचा मित्र पक्ष आहे.

Web Title: Marathi news Meghalaya assembly election Congress NPP