मोदींसोबतची चर्चा निष्फळ; चंद्राबाबू भूमिकेवर ठाम

आर. एच. विद्या
शुक्रवार, 9 मार्च 2018

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरून आक्रमक झालेल्या 'तेलुगू देसम'ने (टीडीपी) केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; पण तोही निष्फळ ठरला.

मोदी यांनी काल सायंकाळी दूरध्वनीवरून चंद्राबाबूंशी चर्चा केली; पण त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. केंद्रातील 'टीडीपी'चे दोन मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे पंतप्रधानांना सादर केले आहेत. 

पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्यानंतर चंद्राबाबूंनी तातडीने मंत्रिमंडळाची उच्चस्तरीय बैठक बोलाविली, लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना 'एनडीए'चा महत्त्वाचा घटक पक्ष असणाऱ्या 'टीडीपी'ने सोडचिठ्ठी दिल्याने राज्यामध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो, असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. 

'तेलुगू देसम'चे मंत्री वाय. एस. चौधरी आणि अशोक गजपती राजू यांनी राजीनामा दिला असला तरीसुद्धा त्यांनी आपण अद्याप राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच (एनडीए) घटक आहोत असे म्हटले आहे. काही अनिवार्य कारणांमुळे आम्हाला हे पाऊल उचलणे गरजेचे होते, असा युक्तिवाद चौधरी यांनी केला. हा दुर्दैवी घटस्फोट असल्याचा दावा करत चौधरी यांनी आम्ही आंध्र प्रदेशचे खासदार म्हणून संसदेमध्ये काम करत राहू, असेही सांगितले.

तत्पूर्वी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देता येणे शक्‍य नसल्याचे सांगताच रात्री उशिरा चंद्राबाबू नायडू यांनी 'एनडीए'मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

भाजपच्या मंत्र्यांचा राजीनामा 
तेलुगू देसम पक्षाचे मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर आज आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळातील भाजपच्या दोन मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरोग्यमंत्री कामीनेनी श्रीनिवास आणि पी. माणिक्‍याला राव यांनी आज राजीनामा दिला. विशेष म्हणजे चंद्राबाबूंनी आपल्याला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल या मंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. 

Web Title: marathi news Narendra Modi n chandrababu naidu tdp out of nda