गुजरातमध्ये 13 हजार तरुणांना सरकारी नोकरीची संधी

महेश शहा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

विधानसभेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना सरकारने म्हटले आहे, की डिसेंबर 2017 पर्यंत 5.38 लाख तरुणांनी नोकरीसाठी नावनोंदणी केली होती. गेल्या दोन वर्षांत राज्यात सात लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील 12 हजार 869 नोकऱ्या (1.77 टक्के) सरकारी क्षेत्रातील आहेत. अन्य 98 टक्के नोकऱ्या खासगी क्षेत्रातील आहेत. 

अहमदाबाद : गुजरातमधील 5.38 लाख बेरोजगार तरुणांपैकी गेल्या दोन वर्षांत 12 हजार 869 तरुणांना सरकारी नोकरी मिळाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने आज विधानसभेत देण्यात आली आहे. निवडणुकीत दिलेले बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्‍वासन पूर्ण करण्यास सुशिक्षित तरुणांच्या संख्येत वेगाने होत असलेली वाढ सत्तारूढ भाजपच्या दृष्टीने अडचणीचे ठरत आहे. 

विधानसभेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना सरकारने म्हटले आहे, की डिसेंबर 2017 पर्यंत 5.38 लाख तरुणांनी नोकरीसाठी नावनोंदणी केली होती. गेल्या दोन वर्षांत राज्यात सात लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील 12 हजार 869 नोकऱ्या (1.77 टक्के) सरकारी क्षेत्रातील आहेत. अन्य 98 टक्के नोकऱ्या खासगी क्षेत्रातील आहेत. 

राज्यातील अहमदाबाद रोजगार विनिमय (एम्प्लॉयमेंट एक्‍क्‍सचेंज) केंद्रांत नोकरीसाठी सर्वाधिक 62 हजार 608 तरुणांनी नोंदणी केली आहे. गुजरात राज्य परिवहन महामंडळात दोन हजार 620 जणांना चालक आणि वाहक म्हणून नोकरीची संधी मिळाली आहे. त्यांची किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अशी आहे. चालक म्हणून निवड झालेले 383 तरुण पदवीधारक आणि द्विपदवीधारक तरुण होते.

राज्याच्या सामाजिक-आर्थिक पाहणीनुसार 31 ऑक्‍टोबर 2017 पर्यंत 5.59 बेरोजगार नोकरीच्या शोधात होते. त्यातील 5.30 लाख सुशिक्षित आणि 29 हजार तरुण अशिक्षित होते.  

Web Title: Marathi News National News Gujrat Youth Got Government Jobs