दहशतवादी अफजल गुरुच्या मुलाला बारावीत 88 टक्के

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

गालिब गुरुला 88 टक्के गुण मिळाले आहेत. यापूर्वी त्याला दहावी परीक्षेत 95 टक्के मिळाले होते.

श्रीनगर : संसदेवरील 2001 सालच्या हल्ल्याप्रकरणातील दोषी अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असून, त्याला उच्च माध्यमिक परीक्षेत 88 टक्के गुण मिळाले आहेत. आज बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये त्याला यश मिळाले आहे.

अफजल गुरु हा 2001 साली संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु याने नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीर उच्च माध्यमिक परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये 55,163 विद्यार्थ्यांपैकी 33,893 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये गालिब गुरुला 88 टक्के गुण मिळाले आहेत. यापूर्वी त्याला दहावी परीक्षेत 95 टक्के मिळाले होते.

''गालिब अफजल गुरुला बारावी परीक्षेत 441 गुण मिळाले आहेत. त्याची टक्केवारी 88 टक्के इतकी आहे. या गुणांच्या माध्यमातून गालिबने हे सिद्ध केले, की त्याने या परीक्षेसाठी तयारी केली होती. या उत्तुंग यशाबाबात त्याचे अभिनंदन केले'', असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सराह हयात यांनी सांगितले. 

Web Title: marathi news national Parliament Attack Convict Afzal Gurus Son Scores 88 percentage In Class 12 Exam