हार्दिक पटेल कॉंग्रेसची साथ सोडणार ? राहुल गांधीना वाटतेय भीती ?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 October 2019

राहुल गांधी यांनी गुजरातमधल्या पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची अनौपचारिक भेट घेतली. राहुल गांधी हे अहमदाबादमध्ये एका केस हिअरिंगसाठी आले असता त्यांनी एका हॉटेलमध्ये हार्दिक पटेल यांची भेट घेतलीये.     

अमित शाह यांच्यावर आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांना मानहानीच्या केसचा सामना करावा लागतोय. याचसंबंधित कोर्टाची तारीख असल्याने राहुल गांधी हे अहमदाबादला आले होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी हार्दिक पटेल यांची भेट घेतली. 

भेटीमागचे ठोकताळे  

नुकताच पाटीदार समाजाचा मोठा चेहरा अल्पेश ठाकोर हा कॉंग्रेस सोडून भाजपात सामील झालाय. याच धरतीवर हार्दिक पटेलही जर कॉंग्रेस पक्ष सोडून गेला तर गुजरातमध्ये कॉंग्रेसला याचा मोठा फटका बसेल. जिग्नेश मेवाणी हे याआधीच डाव्या पक्षाकडे झुकलेले आहेत. त्यामुळे आता हार्दिक पटेल यांनी जर कॉंग्रेसची साथ सोडली तर याचा मोठा फटका पक्षाला बसेल. 

गुजराथमध्ये भाजप मजबूत 

हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी हे तीन मोठे चेहरे असतानाही कॉंग्रेस भाजपला सत्तेपासून दूर ठेऊ शकलेली नाही. त्यामुळे भाजप हार्दिक पटेल यांना इमोशनल ब्लॅकमेल तर करणार नाही ना याची राहुल गांधी यांना चिता वाटतेय.   

पार्टीत फुट पडण्याची भीती ? 

कॉंग्रेसला याचीही भीती वाटतेय की हार्दिक पटेल यांनी आपल्या पाटीदार समर्थकांना हाताशी धरून कॉंग्रेसमध्ये फुट पाडली तर त्याचा मोठा फटका हा कॉंग्रेसला बसू शकतो. अश्या परिस्थितीत कॉंग्रेसला पुन्हा वर्तमान स्थितीत येणं मुश्कील होईल. 

कदाचित हीच काही कारणं आहेत ज्यामुळे राहुल गांधी यांनी हार्दिक पटेल यांची भेट घेतली असू शकते. 

WebTitle : marathi news rahul gandhi met hardik patel in ahemadabad

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news rahul gandhi met hardik patel in ahemadabad