

Marathi signboards and protests in Belagavi highlight the ongoing struggle for linguistic identity.
sakal
बेळगाव : शहरात मराठी फलक फाडले जात असताना निर्माण झालेले मौन आता अपघाती राहिलेले नाही. ते व्यवस्थात्मक झाले आहे. हे मौन काही व्यक्तींचे नाही, तर मराठी समाजाच्या नेतृत्वाच्या सामूहिक अपयशाचा दाखला आहे. प्रश्न असा नाही की कोण बोलले. प्रश्न असा आहे की कोण गप्प बसले आणि का बसले.