Marathwada Liberation: मराठवाडा मुक्ती संग्रामाबाबत अजितदादांची महत्वाची मागणी; काय म्हणालेत जाणून घ्या

मराठवाडा स्वतंत्र भारतात सामिल झाला याला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
NCP Ajit Pawar warn bjp chandrashekhar bawankule over baramati ncp politics remark
NCP Ajit Pawar warn bjp chandrashekhar bawankule over baramati ncp politics remark sakal
Updated on

मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. हा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा हा त्यामागचा प्रमुख उद्देश असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Marathwada liberation struggle should be celebrated says Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

NCP Ajit Pawar warn bjp chandrashekhar bawankule over baramati ncp politics remark
Agra Fort: आग्र्याच्या ऐतिहासिक किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार का? हायकोर्टाचे महत्वाचे निर्देश

मराठवाडा मुक्तीसंग्राम काय आहे?

यंदा मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाची सत्ता असलेल्या हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झालं आणि मराठवाडा निजामापासून मुक्त झाला. म्हणून १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीदिन साजरा केला जोतो. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखील संपूर्ण हैद्राबाद संस्थान भारतात दाखल करण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.