Kittur Murder : लग्नाचा तगादा लावल्याने तरुणाचा दगड, विटाने वडील-भावाकडून खून; मंजुनाथचं एका मुलीवर प्रेम होतं, पण..

Kittur Murder Case : मृत मंजुनाथ याचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, घरच्यांना मुलगी पसंत नव्हती, तरी मुलाच्या हट्टापायी मंजुनाथ व त्याचा मोठा भाऊ यांचा १ वर्षापूर्वी साखरपुडा करण्यात आला.
Kittur Murder Case
Kittur Murder Caseesakal
Updated on
Summary

खुनाची माहिती मिळाल्यानंतर कित्तूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पिराप्पा बसप्पा कुरबर (रा. चिक्कनंदीहळ्ळी) यांचा जबाब नोंदविला.

बेळगाव : लग्नाचा (Marriage) तगादा लावल्यामुळे तरुणाचा भाऊ व पित्याने मिळून खून केल्याची धक्कादायक घटना कित्तूर तालुक्यातील (Kittur Taluka) चिक्कनंदीहळ्ळी गावात शनिवारी (ता. ८) रात्री उशिरा घडली. मंजुनाथ नागाप्पा उळ्ळागड्डी (वय २५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गुरुबसप्पा नागाप्पा उळागड्डी (२८) आणि वडील नागाप्पा गुरुबसप्पा उळ्ळगड्डी (६३) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com