
Brahmin Muslim Marriage Fraud: एका तरुणाने ब्राह्मण असल्याचं समजून तरुणीशी लग्न केलं. पण तरुणी घरी आली तेव्हा तिच्या तोंडून या अल्लाह, अल्लाह की कसम असं ऐकून त्याला धक्का बसला. जेव्हा सत्य समजलं तेव्हा तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने जिच्याशी ब्राह्मण समजून लग्न केलं ती मुस्लिम असल्याचं आणि आधीच विवाहित असून ५ वर्षांच्या मुलाची आई असल्याचं समजलं. या प्रकरणी तरुणाने पोलिसात तक्रार केलीय. तरुणी घरातून अडीच ते ३ लाख रुपये घेऊन फरार झाली आहे.