esakal | लग्न पहावं करुन! चक्क उडत्या विमानात त्यांनी बांधली लग्नगाठ
sakal

बोलून बातमी शोधा

लग्न पहावं करुन! चक्क उडत्या विमानात त्यांनी बांधली लग्नगाठ

लग्न पहावं करुन! चक्क उडत्या विमानात त्यांनी बांधली लग्नगाठ

sakal_logo
By
शर्वरी जोशी

लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो. त्यामुळे हा दिवस अविस्मरणीय करावा अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. म्हणूनच काही जण डेस्टिनेशन वेडिंग किंवा अन्य प्रकारे लग्न करण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नाची चर्चा रंगली आहे. आपला लग्नसोहळा खास व्हावा यासाठी एका जोडप्याने चक्क विमानात (Flying Plane) लग्न केलं आहे. विशेष म्हणजे जिथे लग्नसोहळ्याला केवळ ५० माणसांची परवानगी आहे तेथे चक्क १६१ वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. (Marriage in Flying Plane from Madurai to thoothukudi in Tamilnadu).

सोशल मीडियावर चर्चा होत असलेला हा लग्नसोहळा तामिळनाडूतील दोन मोठ्या व्यावसायिकांच्या मुला-मुलीचा आहे. लग्नसोहळा खास व्हावा यासाठी या दोन्ही कुटुंबाने चक्क उडत्या विमानात लग्न केलं आहे. मदुरै येथील गौरपीलयम येथे राहणाऱ्या एका लाकूड व्यावसायिकाचा मुलगा राकेश याचं लग्न एका उद्योगपतीच्या मुलाशी ठरलं होतं. हा लग्नसोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी दोन्ही कुटुंबाने एका खासगी विमान कंपनीकडे विमान बुक केलं. हे विमान केवळ नातेवाईकांसाठीच बुक करण्यात आलं होतं.

हेही वाचा: VIDEO: कोरोनावर मात केल्यानंतर टुथब्रश का बदलावा?

दरम्यान, लग्न करण्यापूर्वी संपूर्ण वऱ्हाड्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच या वऱ्हाड्यांना विमानात प्रवेश मिळाला, असं खासगी विमान कंपनीकडून सांगण्यात आलं.

loading image