

Couple Dies After Jumping Before Vande Bharat Express
Esakal
वंदे भारत ट्रेनसमोर उडी घेत तरुण आणि तरुणीने आत्महत्या केल्याची घटना लखनऊमध्ये घडलीय. दोघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत जलालपूर रेल्वे क्रॉसिंगजवळ आढळून आले. या प्रकरणी आलम नगर स्टेशन पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. मृतांची नावे सूर्यकांत आणि दीपाली अशी असून यातील सूर्यकांत विवाहित असल्याची माहिती समोर आलीय.