ओमिक्रॉनचे 50% रुग्ण व्हॅक्सिनेटेड, संसर्ग रोखण्यासाठी मास्कची भूमिका महत्वाची

omicron omicron in india
omicron omicron in indiaSakal

देशभरात ओमिक्रॉनचा धोका दिवेंदिवस वाढत आहे. त्याच प्रमाणे रुग्ण दुप्पटीचा वेगही वाढलाय. त्यासाठी लसीकरणावर भर देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र नुकताच आरोग्य मंत्रालयाकडून जारी झालेल्या आकडेवारीत महत्वाची माहिती समोर आली आहे. लसीकरण झालेल्या 183 पैकी 87 किंवा एकूण आकडेवारीच्या 50 टक्के लोकांना या विषाणुचे संक्रमण झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडे उपलब्ध असलेल्या डेटाच्या विश्लेषणातून हे सत्य समोर आलंय. (Omicron in India)

ओमिक्रॉनचं संकट कमी करण्यासाठी फक्त लसीकरण (covid Vaccination) पुरेसं नसल्याचं सरकारी आरोग्य अधिका-यांनी सांगितलं. त्यामुळे मास्कचा वापर आणि सतत सॅनिटायझेशन करत बदलणाऱ्या परिस्थितीवर पाळत ठेवणे हे संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाचे आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी भारतात आढळलेल्या 183 ओमिक्रॉन प्रकरणांचे विश्लेषण जारी केले. यामधील 96 ओमिक्रॉनच्या केसेस अशा आहेत की ज्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं होतं. 87 जणांना कोरोना संरक्षणासंबंधी पूर्ण सुरक्षा पुरवण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे त्यापैकी तिघांना बूस्टर शॉट्सही मिळाले होते. तर दोघांचं अंशतः लसीकरण करण्यात आलं होत. हा डेटा मिळाल्याने मास्क वापरणं आणि सतत स्वतला सॅनियाइझ करत राहण आवश्यक असल्याचं सिद्ध झालंय.

या संपूर्ण केसेसमधील 73 व्यक्तींची लसीकरण स्थिती माहित नव्हती आणि 16 लसीकरणासाठी पात्र नव्हते. 18 ओमिक्रॉन केसेसचा इतिहास माहित नसला तरी उर्वरित 165 जणांच्या विश्लेषणावरून असं दिसून येतं की 121 जण परदेशातून प्रवास करून आले होते. त्यांचं प्रमाण 73 टक्के होतं. लक्षणीय बाब म्हणजे या 165 प्रकरणांपैकी 27 टक्के लोकांना परदेशातून प्रवास केल्याची हिस्टरी नव्हती.

भारताच्या कोविड-19 टास्क फोर्सचे प्रमुख व्ही.के. पॉल (VK Paul) यांनी चेतावणी दिली आहे की, डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन प्रकारात घरांमध्ये संक्रमण होण्याचा धोका जास्त आहे. जो एक व्यक्ती बाहेरून संसर्ग आणतो, तो बाकीच्यांनाही संक्रमित करेल. त्यातच या व्यक्तीने मास्क घातलं नसल्यास ती व्यक्ती कुटुंबातील अन्य सदस्यांनाही संक्रमित करेल, असं ते म्हणाले. Omicron मध्ये संसर्गाचा धोका जास्त आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, असं पॉल म्हणाले.

ICMR चे महासंचालक बलराम भार्गव (Balram Bhargav) यांनी सांगितलं की, क्लिनिकल लक्षणांच्या संदर्भात विश्लेषणातून हे देखील दिसून येतं की 70 टक्के रुग्णांना अद्याप लक्षणंच नाहीत. ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे गंभीर लक्षणं अजून समोर आलेली नाहीत.

भारतात आढळलेल्या सर्व प्रकरणांपैकी एक तृतीयांश प्रकरणं सौम्य लक्षणाची होती आणि बाकीच्या केसेसमध्ये लक्षणंच समोर आली नाहीत, असं ते म्हणाले. त्यामुळे लक्षणं नसलेली बाधित व्यक्ती ओमिक्रॉन जास्त प्रमाणात पसरवू शकते. त्यामुळे मास्क वापरणे हाच ओमिक्रॉनची साखळी तोडण्यासाठी महत्वाचा निर्णय ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com