Chhattisgarh News : छत्तीसगड व तेलंगणच्या सीमेवरील डोंगराळ भागात १० हजारांहून अधिक जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. बस्तरमधील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी मोहीम असून कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
रायपूर : छत्तीसगड आणि तेलंगणच्या सीमेवरील डोंगराळ भागात तब्बल दहा हजार सुरक्षा दलांनी एक हजारांपेक्षाही अधिक नक्षलवाद्यांचा पाठलाग सुरू केला असून ही शोध मोहीम शुक्रवारी पाचव्या दिवशीही सुरूच होती.