

Mau Sarees are crafted using power looms, skilled weaving techniques and intricate design work, making them popular across India.
Sakal
उत्तर प्रदेशातील मऊ जिल्हा आपल्या समृद्ध वस्त्रोद्योगासाठी आणि कुशल विणकरांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. येथे तयार होणाऱ्या सूती, रेशमी, कृत्रिम धाग्यांच्या तसेच मिश्रित कापडांपासून बनविलेल्या साड्या आणि इतर वस्त्रे त्यांच्या आकर्षक नक्षी, उत्तम गुणवत्ता आणि रंगांच्या वैविध्यामुळे ग्राहकांना भुरळ घालतात.
उत्तर प्रदेश सरकारच्या 'एक जिल्हा, एक उत्पादन' (ओडीओपी) उपक्रमामुळे मऊच्या वस्त्रोद्योगाला देशासह परदेशातही नवी ओळख मिळत असून, स्थानिक विणकर आणि लघुउद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत.