दुर्गापूजेतील सहभागाबद्दल नुसरत जहाँवर मौलवींची टीका

पीटीआय
Tuesday, 8 October 2019

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी दुर्गापूजेत सहभाग घेतल्याबद्दल मौलवींनी आक्षेप घेतला आहे. नुसरत जहाँ यांच्या कृतीतून इस्लाम आणि मुस्लिमांची बदनामी होत असून, तिने नाव आणि धर्म बदलावा, असा सल्ला मौलवींनी दिला आहे.

कोलकता - तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी दुर्गापूजेत सहभाग घेतल्याबद्दल मौलवींनी आक्षेप घेतला आहे. नुसरत जहाँ यांच्या कृतीतून इस्लाम आणि मुस्लिमांची बदनामी होत असून, तिने नाव आणि धर्म बदलावा, असा सल्ला मौलवींनी दिला आहे. 

नुसरत जहाँ या बशिरहाट मतदारसंघाच्या खासदार म्हणून प्रथमच निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्यांनी कपाळावर कुंकू अणि मंगळसूत्र घातल्यावरून मौलवींनी टीका केली होती. नुसरत जहाँ यांनी उद्योजक निखिल जैन यांच्याशी विवाह केला आहे. 

दारुल उलुम देवबंदशी निगडित असणारे मौलवी मुफ्ती असद कासमी म्हणाले, की नुसरत जहाँ यांची कृती नवीन नाही, त्यांनी हिंदू देवतांची पूजा केली आहे. दुसरीकडे मुस्लिम धर्म पाळणारे केवळ अल्लाहची प्रार्थना करतात. तिने धर्माबाहेर विवाह केला आहे, त्यामुळे तिने धर्म आणि नाव बदलले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maulavi comment on nusrat jahan by durgapooja