मायावती, चिराग यांना नितीश कुमार यांनी दिला मोठा झटका

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 29 January 2021

बहुजन समाज पक्षा (बसप)च्या सर्वेसर्वा मायावती आणि लोकजनशक्ती पक्षा (एलजेपी)चे अध्यक्ष चिराग पासवान यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा झटका दिला. या दोन्ही पक्षांच्या एकमेव आमदारांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करीत संयुक्त जनता दला (जेडीयू)ची कास धरली.

पाटणा - बहुजन समाज पक्षा (बसप)च्या सर्वेसर्वा मायावती आणि लोकजनशक्ती पक्षा (एलजेपी)चे अध्यक्ष चिराग पासवान यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा झटका दिला. या दोन्ही पक्षांच्या एकमेव आमदारांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करीत संयुक्त जनता दला (जेडीयू)ची कास धरली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘बसप’चे आमदार जामा खान यांनी ‘जेडीयू’त प्रवेश करताना नितीश कुमार हे द्रष्टे नेते असल्याचे म्हटले आहे. ‘एलजेपी’चे एकमेव आमदार राजकुमारसिंह यांनीही नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. नितीश कुमार हे स्वतः मुस्लिमांचे पाठिराखे असल्याचे असल्याचा दावा करीत असले तरी बिहारमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘जेडीयू’चा एकही मुस्लीम उमेदवार विजयी झाला नव्हता. भाजपशी युती केल्याने निवडणुकीत त्यांचा तोटा झाल्याचे मानले जात आहे. अशा वेळी कैमूर मतदारसंघातील जामा खान यांनी ‘बसप’तून बाहेर पडत ‘जेडीयू’त प्रवेश केला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayawati chirag paswan Nitish Kumar Politics