esakal | राजस्थानात सत्ताबदल झाल्यास मायावतींना होणार सर्वाधिक आनंद

बोलून बातमी शोधा

Mayawati will be happiest if there is a change of government in Rajasthan

राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगलेच गरम होत असून राजस्थानात जर सत्ताबदल झाला तर सर्वाधिक आनंद हा बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावतींना होईल. विधानसभा निवडणुकीत बसपाचे ६ आमदार निवडून आले होते. त्यावेळी अशोक गेहलोत सरकारकडे १०० आमदार होते आणि बसपाने काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला होता.

राजस्थानात सत्ताबदल झाल्यास मायावतींना होणार सर्वाधिक आनंद
sakal_logo
By
अशोक गव्हाणे

जयपूर : राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगलेच गरम होत असून राजस्थानात जर सत्ताबदल झाला तर सर्वाधिक आनंद हा बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावतींना होईल. विधानसभा निवडणुकीत बसपाचे ६ आमदार निवडून आले होते. त्यावेळी अशोक गेहलोत सरकारकडे १०० आमदार होते आणि बसपाने काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या उत्तरप्रदेशमध्ये सक्रिय झाल्या होत्या आणि दलित मतदारांची समिकरणे जुळवण्यास त्यांनी सुरवात केली होती, हे मायावतींना अमान्य होते. अशातच काँग्रेसने बसपाच्या सहाही आमदारांना आपल्या पक्षात घेतले. त्यांनंतर मायावतींचा संताप अनावर झाला होता आणि त्यांनी काँग्रेस पक्ष हा धोखेबाज असल्याचेही बोलले होते. तेव्हापासून काँग्रेस नेहमी मायावतींच्या निषाण्यावर राहिली आहे. अशात काँग्रेसची सत्ता गेल्यास सर्वाधिक आनंद हा मायावतींनाच होईल.

दरम्यान, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारसमोर अडचणी उभ्या ठाकल्या असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे त्यांच्यासोबत ३० आमदार असल्याचा दावा करत असून ते ३० आमदारांसह भाजपमध्ये जातील, अशी चर्चा सुरू आहे. तसेच, सचिन पायलट यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृतरित्या माहिती मिळू शकली नाही. 

सचिन पायलट यांनी रविवारी दिल्लीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची भेट घेतली खरी, पण त्यानंतर ते अलीकडेच भाजपमध्ये सहभागी झालेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांचीही भेट घेतली. ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सचिन पायलट यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर एक ट्वीट केले. मित्राच्या सध्याच्या स्थितीवर दया येते, मुख्यमंत्री गेहलोत सचिन पायलट यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसमध्ये कर्तृत्व आणि क्षमता यांना प्राधान्य दिले जात नाही अशा स्वरुपाचे हे ट्वीट आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट एक पर्याय म्हणून भाजपशी चर्चा करत आहेत. भाजपने बाहेरुन पाठिंबा देण्याची तयारी दाखवली तर निवडक आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सचिन पायलट करत आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर सचिन पायलट मुख्यमंत्री होण्यास उत्सुक आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे.