AHMEDABAD PLANE CRASH: “विमान कोसळल्याचे कळताच भीतीने हादरलो!” – डॉ. सलोनी मांढरे, ‘अवघ्या ५०० मीटरवर विमान अपघात’
Medical Student : अहमदाबाद विमान अपघाताजवळच होस्टेलमध्ये असलेल्या कर्वेनगरच्या डॉ. सलोनी मांढरे यांनी त्या क्षणांचे अनुभव सांगितले. "फक्त ५०० मीटर अंतरावर अपघात घडल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं," असे त्यांनी सांगितले.
शिवणे : अहमदाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आठ नंबर गेटजवळ मंगळवारी दुपारी विमान अपघाताची धक्कादायक घटना घडली. हे ठिकाण आमच्या होस्टेलपासून अवघ्या ५०० ते ६०० मीटर अंतरावर असल्याने सुरुवातीला भीती वाटली.