
'जुन्या लोकांना पक्षात स्थान नाही, त्यामुळं अशा पक्षात राहण्यात काहीच अर्थ नाही. मी जड अंतःकरणानं जेडीयू सोडण्याची घोषणा करते.'
Nitish Kumar News: CM नितीशकुमारांना मोठा धक्का; कुशवाहांनंतर 'या' माजी खासदारानं घेतला मोठा निर्णय
Nitish Kumar News: : बिहारच्या राजकीय (Bihar Political) वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आराहच्या माजी खासदार आणि भोजपूरच्या जेडीयू नेत्या मीना सिंह (JDU leader Meena Singh) यांनी जनता दल युनायटेड (JDU) सोडण्याची घोषणा केलीये.
पक्ष मजबूत करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे योगदान दिलं. पक्षाला जिथं गरज होती, तिथं आम्ही खंबीरपणे उभं राहिलो. मात्र, पक्षानं आमच्याकडं वारंवार दुर्लक्ष केलं.
आता जेडीयूमध्ये काम करणं आमच्यासाठी खूप कठीण झालं होतं. कारण, आता जेडीयूनं आपली धोरणं आणि तत्त्वं सोडली आहेत, असा आरोप मीना सिंह यांनी केलाय.
मीना सिंह म्हणाल्या, 'जुन्या लोकांना पक्षात स्थान नाही, त्यामुळं अशा पक्षात राहण्यात काहीच अर्थ नाही. मी जड अंतःकरणानं जेडीयू सोडण्याची घोषणा करते.' मीना सिंह आराहमधून जेडीयूच्या खासदार आहेत.
त्यांचे पती दिवंगत अजित सिंह हे देखील जेडीयूच्या तिकिटावर करकटमधून खासदार होते. ते नितीशकुमार यांच्या जवळचे मानले जात होते.
पण, त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी मीना सिंह राजकारणात सक्रिय झाल्या आणि जेडीयूच्या तिकिटावर आराहमधून खासदार म्हणून त्या निवडून आल्या. मात्र, आता त्यांनी JDU सोडण्याची घोषणा केलीये.