स्वॅग! साडी नेसून हॉर्स रायडिंग; पाहा अफलातून व्हिडीओ

मोनालिसा यांनी यापूर्वीदेखील साडी नेसून धाडसी काम केली आहेत
स्वॅग! साडी नेसून हॉर्स रायडिंग; पाहा अफलातून व्हिडीओ

महिलांमध्ये सध्या साडी नेसून वर्कआऊट करणं किंवा अन्य धाडसी कामं करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. या ट्रेंडमध्ये अनेक महिलांनी त्यांचे भन्नाट व्हिडीओ शेअरदेखील केले आहेत. यामध्येच सध्या सोशल मीडियावर ओडिसामधील (odisha) एका महिलेचा हॉर्स रायडिंग करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला चक्क सहावारी साडी नेसून घोडेस्वारी करत आहे. (meet-odisha-woman-rides-horse-wearing-saree-and-smashing-stereotypes)

सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या महिलेचं नाव मोनालिसा भद्र असं असून त्या ओडिशातील जाजपुर जिल्ह्यातील जहाल गाव येथे राहते. मोनालिसा यांनी त्यांच्या युट्युबवर हॉर्स रायडिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

अनेकदा साडीमध्ये अमूक काम कसं करु किंवा मला ते कसं जमेल अशी तक्रार महिला करत असतात. मात्र, मोनालिसा यांनी या सगळ्या तक्रारींना छेद दिला आहे. त्या घरातील कामांपासून अनेक धाडसी कामांपर्यंत प्रत्येक गोष्ट साडी नेसूनच करतात. त्यामुळे कायमच त्यांची सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. यापूर्वीदेखील त्यांनी साडी नेसून टॅक्टर चालवला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचं कौतुक होत आहे.

मोनालिसा यांनी २०१६ मध्ये त्यांचं युट्यूब चॅनेल सुरु केलं असून या चॅनेलवर त्या कायम महिलांना प्रोत्साहन देणारे व्हिडीओज शेअर करत असतात. विशेष म्हणजे या सगळ्याचं श्रेय त्या त्यांच्या नवऱ्याला बद्री नारायण यांना देतात. बद्री नारायण सामाजिक कार्यकर्ता असण्यासोबत क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत.

स्वॅग! साडी नेसून हॉर्स रायडिंग; पाहा अफलातून व्हिडीओ
विदेशी नागरिकांमध्ये संस्कृत शब्दाची क्रेझ

दरम्यान, यापूर्वी मोनालिसा यांनी साडी नेसून ट्रक, बसदेखील चालवली आहे. त्यांच्या याच हरहुन्नरी आणि आत्मविश्वासूनस्वभावामुळे त्या सर्वत्र ओळखल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com