esakal | सुषमा स्वराजांचे अखेरचे आश्वासन मुलीकडून पूर्ण, पाहा कोणते...
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Swaraj

बांन्सुरीने तुझी शेवटची इच्छा पूर्ण केली. कुलभूषण जाधव यांचा खटला लढवणारे वकील हरीश साळवे यांचा एक रुपया फी तू मागे सोडली होतीस. बांन्सुरीने तो एक रुपया हरीश साळवे यांना भेट म्हणून दिला आहे.

सुषमा स्वराजांचे अखेरचे आश्वासन मुलीकडून पूर्ण, पाहा कोणते...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माजी दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे अखेरचे आश्वासन त्यांची मुलगी बांन्सुरी हिने पूर्ण केले आहे. 

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय कोर्टात चालवणारे भारताचे वकील हरीश साळवे यांना त्यांची एक रुपया एवढी फी देण्यासाठी स्वराज यांनी त्यांना घरी बोलाविले होते. पण, त्यापूर्वीच सुषमा स्वराज यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे अखेरचे आश्वासन अपूर्ण राहिले होते. अखेर त्यांची कन्या बांन्सु हिने हरीश साळवे यांना कुलभूषण जाधव खटल्यासाठीची 1 रुपया ही फी देत आईचे अखेरचे आश्वासन पूर्ण केले. 

सुषमा स्वराज यांच्या निधनापूर्वी साळवेंना फोन करत फी घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र त्यापूर्वी अचानक त्यांचे निधन झाले. बांन्सुरी हिने शुक्रवारी हरीश साळवे यांना त्यांची फी घेण्यासाठी बोलविले होते. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. “बांन्सुरीने तुझी शेवटची इच्छा पूर्ण केली. कुलभूषण जाधव यांचा खटला लढवणारे वकील हरीश साळवे यांचा एक रुपया फी तू मागे सोडली होतीस. बांन्सुरीने तो एक रुपया हरीश साळवे यांना भेट म्हणून दिला आहे.