काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक आज

वृत्तसंस्था
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

- अनेक नेतमंडळी राहणार उपस्थित.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज (शनिवार) मध्य प्रदेश येथे पार पडणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. ही बैठक नेमक्या कोणत्या कारणासाठी आयोजित करण्यात आली, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला तर आम आदमी पक्षाचे सरकार आता सत्तेवर येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवार) पार पडत आहे. मात्र, तत्पूर्वी काँग्रेसची मध्य प्रदेशात महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. यामध्ये मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग, दीपक बाबरिया, मीनाक्षी नटराजन आणि जितू पटवारी उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. 

‘एनआयए’कडे तपास देण्यावरून शिवसेना व ‘राष्ट्रवादी’त मतप्रवाह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of MP Congress Coordination Committee scheduled to be held today