मेघालय, नागालँड आणि त्रिपुरात आज मतमोजणी 

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

मतदानानंतर झालेल्या कलचाचणीमध्ये तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेल्याने या पक्षामध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. त्रिपुरामध्ये 25 वर्षांपासून असलेली डाव्या पक्षांची सत्ता जाऊन त्या ठिकाणी भाजप सत्तेवर येईल, असा अंदाज कलचाचणीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय मेघालय आणि नागालॅंडमध्ये भाजप सत्तेचा प्रबळ दावेदार राहण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली : मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (शनिवार) होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर तिन्ही राज्यांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतदानानंतर झालेल्या कलचाचणीमध्ये तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेल्याने या पक्षामध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. त्रिपुरामध्ये 25 वर्षांपासून असलेली डाव्या पक्षांची सत्ता जाऊन त्या ठिकाणी भाजप सत्तेवर येईल, असा अंदाज कलचाचणीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय मेघालय आणि नागालॅंडमध्ये भाजप सत्तेचा प्रबळ दावेदार राहण्याची चिन्हे आहेत.

आज मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी, तर इतर दोन राज्यांमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान झाले होते. 

मेघालय आणि नागालँड विधानसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकीत सरासरी 75 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर त्रिपुरा विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत 74 टक्के मतदान झाले होते. मात्र हे गेल्या वेळच्या मतदानापेक्षा 17 टक्के कमीच होते. गेल्या वेळेला विधानसभेसाठी 91.82 टक्के मतदान झाले होते. आज 60 जागांपैकी 59 जागांवर मतदान झाले.

Web Title: Meghalaya Nagaland Tripura assembly election results