

Mehbooba Mufti
esakal
अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या श्रीनगर दौऱ्यानंतर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी या दौऱ्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीरच्या प्रश्नांचे निवारण अमेरिकेकडून होऊ शकत नाही, या मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या मताशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचे मुफ्ती यांनी स्पष्ट केले.
मात्र, २०१९ नंतर विदेशी पाहुण्यांचे दौरे केवळ पूर्वनियोजित आणि औपचारिक स्वरूपाचे झाले असून त्यांना स्थानिक जनतेशी किंवा समाजातील विविध घटकांशी संवाद साधू दिला जात नाही, अशी टीका त्यांनी केली.