जम्मू-काश्मीर : मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला अटकेत

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

जम्मू-काश्‍मीरच्या फेररचनेचे विधेयक राज्यसभेत मांडण्याआधी रविवारी रात्री मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांना सोमवारी (ता.5) रात्री अटक करण्यात आली.

जम्मू-काश्‍मीरच्या फेररचनेचे विधेयक राज्यसभेत मांडण्याआधी रविवारी रात्री मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था ढासळू नये, म्हणून या दोन्ही नेत्यांना पोलिसांनी रात्रीच्या सुमारास अटक केली.

जम्मू-काश्‍मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन आणि इम्रान अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी 370 कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केले. त्यानंतर जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mehbooba Mufti and Omar Abdullah arrested