
श्रीनगर : युद्धामुळे कोणालाच लाभ होत नाही, त्यामुळे केवळ विध्वंस होतो आणि लोकांना जीव गमवावा लागतो, असे मत पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या(पीडीपी) नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे संवादाचा मार्ग निवडावा असे आवाहनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले आहे. श्रीनगर येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.